kimaya narayan
अभिनेत्री,लेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी कायमच तिच्या कलाकृतींमुळे चर्चेत असते. पण यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
मधुगंधा लेखिका म्हणून प्रसिद्ध होतीच पण अभिनेत्री म्हणून सगळयांच्या घराघरात पोहोचली ती जुळून येति रेशीमगाठ या मालिकेमुळे. या मालिकेत तिने मेघनाच्या जाऊबाईची भूमिका साकारली होती जी सगळ्यांना आवडली.
प्राजक्ता पाठोपाठ मधुगंधा आणि तिचा पती दिग्दर्शक परेश मोकाशी यांनीही फार्महाऊस बांधलं. बऱ्याचदा सोशल मीडियावर ती याचे फोटो शेअर करत असते.
मधुगंधा आणि परेश यांच्या फार्महाऊसचं नाव हिरण्य फार्म्स असं आहे. तीन एकरमध्ये हे फार्महाऊस तिने बांधलं आहे.
आजूबाजूला झाडी, घर, स्विमिंग पूल, गायीचं गोठा असं सुंदर फार्महाऊस मधुगंधाने बांधलं आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले होते.
मधुगंधाने आता तिचं फार्महाऊस स्टिलेशन म्हणून भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. इथे एक दिवसाचं भाडं ८ ५ ० ० ते ९ ० ० ० आहे. इथे आठ जण एकावेळेस राहू शकतात. पाच वर्षांच्या खालील मुलांचे पैसे आकारले जात नाही.
मधुगंधाने गायीची पाळल्या आहेत. याशिवाय त्यांच्या पेट डॉग्स बरोबरही तिथे येणारे लोक वेळ घालवू शकतात.
सोशल मीडियावर सध्या या फार्महाऊसची चर्चा आहे.