kimaya narayan
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लोकप्रियता आजही कायम टिकून आहे. तिच्या एव्हरग्रीन सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
माधुरीच्या तरुणपणी अनेक अभिनेत्यांशी तिचं नाव जोडलं गेलं. अनेक अभिनेत्यांना तिने डेट केल्याच्या चर्चाही होत्या.
पण माधुरीने या चर्चांना फाटा देत अमेरिकेत स्थायिक असलेले डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. यामुळे सगळ्यांना धक्का बसला.
तिच्या कारकिर्दीत तिची जोडी गाजली ते अनिल कपूरबरोबर. अनिल विवाहित असूनही त्याच्याशी तिचं नाव जोडलं गेलं.
पण माधुरीने एका मुलाखतीत अनिलसारख्या व्यक्तीशी नकार दिला. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने मला अनिलसारख्या व्यक्तीशी लग्न करायचं नाही असं म्हणाली.
"अनिल हा खूप संवेदनशील व्यक्ती आहे. मला माझा नवरा शांत हवा" असं तिने सांगितलं.
माधुरी सध्या रिअलिटी शोचं परीक्षण करतेय. लवकरच ती नव्या सिनेमातून भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.