kimaya narayan
ऐंशीच्या दशकात गाजलेला एक सिनेमा म्हणजे राम तेरी गंगा मैली. राजीव कपूर यांचं पदार्पण असलेला हा सिनेमा खूप चर्चेत राहिला ते या सिनेमातील निळ्या डोळ्यांच्या अभिनेत्रीमुळे.
अभिनेत्री मंदाकिनी यांनी या सिनेमातून पदार्पण केलं. त्यांच्या सौंदर्याने त्या काळातील सगळे तरुण घायाळ झाले.
या सिनेमात त्यांनी पहाडी मुलीची भूमिका साकारलेली. त्यांच्या सौंदर्याबरोबरच अभिनयही कौतुकास्पद ठरला.
मंदाकिनी यांनी 1990 मध्ये उद्योगपती काग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे.
मंदाकिनी यांची लेक राबझे इनाया ठाकूरचे फोटो व्हायरल झाले आहेत. राबझे आईप्रमाणेच सुंदर दिसते आणि आतापासूनच सोशल मीडियावर तिची चर्चा सुरु झालीये.
राबझेच्या सौंदर्याचे फॅन्स आतापासूनच अनेकजण झाले आहेत. सध्या ती तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे.
लवकरच त्यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. या शिवाय तिची सूनही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असून नेटफ्लिक्समध्ये ती नोकरीला आहे.