kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सध्या ती मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
प्राजक्ता सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिचे फोटोही खूप गाजतात.
प्राजक्ताची गाजलेली मालिका म्हणजे झी मराठीवरील जुळून येती रेशीमगाठी, या मालिकेतील तिची आणि आदित्यची जोडी खूप गाजली.
अभिनेता ललित प्रभाकरने ही भूमिका साकारलेली. त्यांची जोडी प्रत्यक्षातही असावी अशी अनेकांची इच्छा होती.
प्राजक्ता आणि ललितचा लग्न झालेला फोटो काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनी लग्न केल्याची चर्चा सगळीकडे पसरली होती.
याचे फोन अगदी प्राजक्ताच्या आईलाही गेले. तिने मुलीला फोन करून नेमका हा काय प्रकार आहे असं विचारलं. पण ते फोटो एका डान्स परफॉर्मन्समधील होते.
प्राजक्ता आणि ललितने एका शोदरम्यान लग्नाचा अभिनय केला होता. त्याचे फोटो काहींनी व्हायरल करून त्यांचं लग्न झाल्याचं म्हटलं होतं. पण तस काहीही नसून ते चांगले मित्र असल्याचं तिनेत्यावेळी स्पष्ट केलं होतं.