Pranali Kodre
फिटनेस हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. अभिनेत्री मिताली श्रीवास्तव हिने सकाळ सोबत तिचा फिटनेस मंत्रा शेअर केला होता.
Mitali Shrivastav Fitness Secret
मिताली म्हणते, माझ्यासाठी फिटनेस ही केवळ शरीराची गोष्ट नाही, तर सकारात्मक, शिस्तबद्ध आणि आनंददायी जीवनशैली आहे.
Mitali Shrivastav Fitness Secret
तिने सांगितले ती दररोज योगासने आणि आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस जीम करते. तसेच वेळ मिळेल, तसे टेनिस, पॅडल किंवा बॅडमिंटनसारखे खेळ आवर्जून खेळते.
Mitali Shrivastav Fitness Secret
मितालीने सांगितले, मी उपाशीपोटी ४५ मिनिटं कार्डिओ करते. त्यानंतर हायड्रेशनसाठी जिरे पाणी, लिंबूपाणी किंवा ॲपल सायडर व्हिनेगर पाणी घेते.
Mitali Shrivastav Fitness Secret
ती म्हणते दिवसातून दोनच वेळा जेवते, सकाळी व्यायामानंतर आणि सायंकाळी जीमनंतर. तसेच रात्री झोपण्याआधी गरम पाणी, ग्रीन टी किंवा पेपरमिंट टी घेते, ज्यामुळे चांगली झोप मिळते आणि पचन सुधारते.
Mitali Shrivastav Fitness Secret
मिताली म्हणते मी नेहमी कॅलरी डिफिसिटमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच, जेवढे खाते त्यापेक्षा जास्त कॅलरी जाळते. कॅलरी जाळण्यासाठी व्यायाम, चालणे, योगासने किंवा खेळ खेळते. यामुळे वजन नियंत्रित राहते आणि शरीरही तंदुरुस्त राहते.
Mitali Shrivastav Fitness Secret
आहाराच्या बाबतीत माझ्या शरीराला सगळ्यात जास्त फायदेशीर घरचे अन्न वाटल्याचे ती सांगते. भाकरी, भाजी आणि कधीमधी मोजून घेतलेला ५० ग्रॅम भात. तसेच जेवणापूर्वी भरपूर काकडी खाते, कारण कमी कॅलरीमध्ये पोट भरते आणि भूकही आटोक्यात राहते.
Mitali Shrivastav Fitness Secret
रोज सकाळी भोपळ्याच्या टरबुजाच्या बिया तीळ आवर्जून खात असल्याचेही तिने सांगितले. तसेच ‘क’ जीवनसत्त्वाचे सप्लिमेंट्स घेते, आणि फिश ऑईल, मल्टिव्हिटॅमिन्सचाही समावेश तिच्या आहारात असल्याचे तिने सांगितले.
Mitali Shrivastav Fitness Secret
दररोज किमान दहा हजार पावलं चालण्याचा प्रयत्न करत, असल्याचे तिने सांगितलं.
Mitali Shrivastav Fitness Secret
फास्ट फूड किंवा पकिटातले अन्न शक्यतो टाळावे. जेवणात काय आहे, हे स्वतःला समजणे खूप महत्त्वाचे असते. कारण शरीरात होणारा बदल तुम्ही खात असलेल्या गोष्टींवरच अवलंबून असतो.
Mitali Shrivastav Fitness Secret
ती नेहमी म्हणते, की आपल्या शरीराची काळजी घ्या; ‘शरीर म्हणजे मंदिर’. स्वच्छ खा, भरपूर पाणी प्या.
Mitali Shrivastav Fitness Secret
फिटनेसचा प्रवास क्लिष्ट करू नका. तो जितका साधा ठेवाल, तितकेच तुमचे शरीर मजबूत, सुंदर आणि सुरक्षित राहील, असंही मिताली सांगते.
Mitali Shrivastav Fitness Secret