चिडचिड होतेय, राग आला? चालायला जा, होतील 'हे' फायदे

Pranali Kodre

राग आणि चिडचिड

जवळपास प्रत्येकदाच कमी - जास्त प्रमाणात राग येतो किंवा चिडचिड होतेच. यासाठी कारणं अनेक असून शकतात. कधी भांडण, तर कधी मनासारखं न घडणे, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे राग येऊ शकतो.

Benefits of Walking | Sakal

चुकीच्या गोष्टी टाळणं महत्त्वाचं

बऱ्याचदा रागाच्या भरात चुकीच्या गोष्टीही होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळणं महत्त्वाच असतं.

Benefits of Walking | Sakal

चालायला जा

त्यामुळे जेव्हा राग येईल किंवा चिडचिड होईल, तेव्हा चालायला जाण्याचा एक सोपा मार्ग, यामुळे राग आणि चिडचिड कमी होण्यास मदत होते.

Benefits of Walking | Sakal

एन्डॉर्फिन हार्मोन्स

चालायला गेल्याने एन्डॉर्फिन हार्मोन्स म्हणजेच 'फील-गुड' हार्मोन्स तयार होतात. यामुळे मूड सुधारतो.

Benefits of Walking | Sakal

तणाव कमी होतो

चालायला गेल्याने कोर्टिसोल (Stress hormone) कमी होतो आणि मन शांत व्हायला मदत होते.

Benefits of Walking | Sakal

मनाचा फोकस बदलतो

चालायला गेल्याने आजूबाजूच्या गोष्टी दिसतात, त्यामुळे राग किंवा नकारात्मक विचारांपासून मन दूर जाते. आजूबाजूच्या वातावरणात गुंतते. त्यामुळे राग किंवा चिडचिड कमी होण्यास मदत होते.

Benefits of Walking | Sakal

झोप चांगली लागते

चालल्याने रात्री झोपही चांगली लागू शकते आणि मूड स्थिर राहतो. याशिवाय हृदयही निरोगी राहण्यास मदत होते.

Benefits of Walking | Sakal

स्वत:शी संवाद साधता येतो

चालताना स्वत:शी संवाद साधता येतो. काय बरोबर काय चूक याची जाणीव व्हायला मदत होते. स्वत:शी संवाद साधल्याने मन हलके होते.

Benefits of Walking | Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Benefits of Walking | Sakal

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी एकदम सोप्या ५ टिप्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lifestyle Hacks to Feel Fresh | Sakal
येथे क्लिक करा