Anuradha Vipat
परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा हे नुकतेच 'आप की अदालत' या कार्यक्रमात आले होते
यावेळी राघवला त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर राघवने दिलेलं उत्तर ऐकून परिणितीचे चाहते चांगलेच भडकले आहेत.
वैवाहिक आयुष्याबद्दल राघव म्हणतो, आम्ही आनंदाने विवाहित आहोत. ती खुश आहे आणि मी विवाहित आहे. मी माझी चूक मान्य करतो आणि ती माझ्याशी सहमत होते की हो चूक तुमचीच होती. याने सर्व समस्या ठीक होतात.
पुढे राघव म्हणतो, वैवाहिक आयुष्याचं एक मंत्र आहे, तुम्ही ते समजून घेतलात तर तुमचं लग्न खूप यशस्वी ठरेल. तो मंत्र म्हणजे ‘हॅपी वाइफ इज हॅपी लाइफ’
पुढे राघव म्हणतो,लग्न हे एक असं बंधन आहे ज्यामध्ये एक व्यक्ती नेहमी बरोबर असतो आणि दुसरी व्यक्ती नेहमी चूक असतो
राघवचे हे बोलणे ऐकून परिणीतीचा चेहराचं पडतो