Anuradha Vipat
अभिनेत्री नेहा शितोळे बऱ्याच काळानंतर टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
अशोक मा. मा. या मालिकेत नेहा फुलराणी ही भूमिका निभावताना दिसत आहे.
आता एका मुलाखतीत अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव नेहाने सांगितला आहे.
नेहाने म्हटले की, “ज्या पद्धतीचं फुलराणी व अशोक मा. मा. यांचं नातं आहे, तसंच काहीसं नातं माझं आणि अशोक सराफ अशा आम्हा दोघांमध्ये तयार होऊ लागलं आहे
पुढे नेहाने म्हटले की, माझ्यामागे पळण्यामध्ये किंवा सीन करताना त्यांची खूप धावपळ होते. त्यामुळे काही काही वेळेला वाटतं की, माझ्यामुळे तो माणूस दमतोय.
आता अशोक मा. मा. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे
अभिनेत्री नेहा शितोळे बिग बॉस मराठीच्या दुसर्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.