Anuradha Vipat
बिग बॉस’ फेम अभिनेत्री पवित्रा पुनिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात असताना ती अभिनेता एजाज खानच्या प्रेमात पडली. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते.
एजाजने पवित्रावर धर्मांतरासाठी दबाव आणला म्हणून तिने ब्रेकअप केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र धर्मांतर करणार नसल्याचं मी एजाजला रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं, असं पवित्राने स्पष्ट केलं.
यानंतर सोशल मीडियावर एका युजरने पवित्राला कुराण वाचण्याचा आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्यावर पवित्राने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.
“बेटा.. मला शिकवू नकोस. अन्यथा सनातन धर्म काय आहे हे चांगल्याप्रकारे समजावण्यासाठी माझ्याकडे खूप वेळ आहे अशा शब्दांत पवित्राने युजरला सुनावलं आहे
पवित्रा सोशल मिडीयावर सक्रिय असते