Pranali Kodre
राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आणि अभिनेत्री प्राची तेहलान म्हणते आजकालच्या धावपळीच्या जगात फिट आणि तंदुरुस्त राहणे म्हणजे केवळ एक ट्रेंड नाही, तर जीवनशैलीच बनली पाहिजे.
ती म्हणते फिट राहणे म्हणजे फक्त दिसायला छान असणे नाही. फिटनेससाठी महागडी जिम, डाएट प्लॅन लागतो असेही नाही. फक्त थोडी शिस्त आणि नियमितपणा पाहिजे.
प्राची नियमित पणे व्यायाम करते, आहार आणि झोप यालाही पुरेसे महत्त्व देते. ती म्हणते माझ्या आरोग्याचे सर्वांत महत्त्वाचे सूत्र आहे, ते म्हणजे दिवसभर हालचाल करत राहणे.
प्राचीने सांगितलेला फिटनेस मंत्र आपण थोडक्यात जाणून घेऊ.
दिवसाची सुरुवात जिम, वॉक किंवा खेळ याने करा. यामुळे दिवसभर ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते.
रोजचे रुटिन महत्त्वाचे. हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. घरच्या घरी व्यायाम, पार्कमध्ये धावणे, किंवा एखादा खेळ खेळणे प्रभावी ठरते.
फिट राहण्यासाठी खाण्याच्या सवयी सर्वांत महत्त्वाच्या. प्रोटिनयुक्त आहार, अनहेल्दी कार्ब्जपासून दूर राहणे हे मुख्य आहे.
ट्रेडमिलवर धावण्याऐवजी एखादा खेळ खेळा. यात शरीरासोबत मनही प्रसन्न राहते, आणि मजाही येते.
फिटनेस हा एक प्रवास आहे. सातत्याने प्रयत्न करत राहिलात, तर तो तुमच्या जीवनशैलीचा भाग होईल.