Pranali Kodre
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही तिच्या फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठीही ओळखली जाते.
साराने लंडनमधून क्लिनिकल अँड पल्बिक हेल्थ न्युट्रीशनमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे ती आहाराबाबत जागृत असते.
सारा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही हेल्दी रेसिपीही शेअर करत असते, अशीच एक हेल्दी ड्रिंकची रेसिपी तिने शेअर केली आहे.
साराने पायनॅपल-मँगो प्रोटीन स्मूदीची रेसिपी शेअर केली आहे. म्हणजे आंबा आणि अननस या फळांचा वापर करून तिने ही स्मूदी बनवली आहे.
साहित्य १ कप थंड आंबा आणि अननसाचे तुकडे, १ टी स्पून सुकलेल्या नारळाचा किस, १ टी स्पून भिजवलेले चिया सीड्स, १ स्कूप व्हॅनिला व्हे प्रोटीन, अर्धा कप नारळ पाणी आणि थोडं नारळाचं दूध
सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकत्र टाकावे आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये सर्व बारीक होऊन एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या. झालं तुमची स्मूदी तयारी आहे.
मिस्करच्या भांड्यातील स्मूदी बर्फाच्या क्युब्ससह ग्लासमध्ये ओता आणि पिण्यासाठी स्मुदी तयार आहे.
ही एक हेल्दी स्मूदी असून त्यात भरपूर प्रोटीन, फायबर आणि इलेक्ट्रोलाइट्स आहेत.