Anuradha Vipat
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषयावर बोलताना काल आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच नाव घेतलं
यानंतर प्राजक्ता माळीने याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.
प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर कारवाई करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
त्याचंबरोबर आता प्राजक्ता माळीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता याबाबत माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार’ असल्याचे प्राजक्ता माळीने सांगितले आहे
प्राजक्ता माळी थेट पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत