kimaya narayan
बॉलिवूडमध्ये अनेक देखण्या अभिनेत्री होऊन गेल्या त्यातीलच एक प्रिया राजवंश. एका फोटोच्या जोरावर बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रीच्या खुनाचं गूढ अजून उकललेलं नाही.
प्रिया यांचा जन्म ३० डिसेंबर १९३६ला झाला. त्यांचं खरं नाव वीरा सुंदर सिंग असं होतं. पुढे त्या कुटूंबासहित लंडनला स्थायिक झाल्या.
वीरा यांना अभिनयात रस होता म्हणून त्यांनी रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स स्कुल लंडनमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी मॉडेलिंगही केलं. यातीलच त्यांचा फोटो निर्माता रणवीर सिंह आणि चेतन आनंद यांनी पहिला आणि वीराला सिनेमाची ऑफर मिळाली.
१९६३ला चेतन यांच्या भारत- चीन युद्धावर आधारित हकीकत सिनेमातून त्यानी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चेतन यांनीच त्यांना प्रिया राजवंश असं नाव दिल.
प्रिया चेतन यांच्यापेक्षा पंधरा वर्षं लहान होत्या. पण ते बराच काळ लिव्ह इन मध्ये होते. चेतन विवाहित होते आणि त्यांना दोन मुलंही होती.
चेतन यांनी त्यांची जेवढी मालमत्ता त्यांच्या मुलांच्या म्हणजेच केतन आणि विवेक यांच्या नावावर केली तेवढीच प्रिया यांच्या नावावर केल्यामुळे वाद वाढला. चेतन यांच्या निधनानंतर हा वाद टोकाला पोहोचला.
२७ मार्च २००० प्रिया यांचा मृतदेह त्यांच्या नावावर केलेल्या जुहू येथील बंगल्यावर सापडला. पोलिसांनी हा खून असल्याचं स्पष्ट करत चेतन आणि विवेक यांना अटक केली.
पोलीस चेतन आणि विवेक यांच्यावरील आरोप सिद्ध न करू शकल्यामुळे त्यांची सुटका झाली.