kimaya narayan
बॉलिवूडमध्ये नव्वद आणि 2000 चं दशक गाजवणारी मराठी अभिनेत्री म्हणजे नम्रता शिरोडकर. साऊथ मध्ये ती महेश बाबूची पत्नी म्हणून प्रसिद्ध आहे.
महेश बाबूशी लग्न होण्यापूर्वी नम्रता एका वेगळ्याच व्यक्ती बरोबर रिलेशनशिपमध्ये होती हे तुम्हाला माहितीये का ? त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूने नम्रताला खूप मोठा धक्का बसला होता.
महेश आयुष्यात येण्यापूर्वी नम्रता दीपक शेट्टीच्या प्रेमात होती. दीपकचा रेस्टॉरंटचा बिझनेस होता. नऊ वर्षं ते दोघेही रिलेशनशिप मध्ये होते आणि नम्रता त्याच्यासाठी करिअर सोडण्यास तयार होती.
रेडीटवरील आईबीटाइम्सच्या रिपोर्टनुसार, ते दोघेही लिव्ह इन मध्ये राहत होते आणि लवकरच लग्न करणार होते. पण त्यापूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर नम्रता डिप्रेशनमध्ये होती.
ईटाईम्स ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी नम्रताने सांगितलं कि,"एक वेळ असा होता जेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर माझ्या व्यावसायिक जीवनावर वर्चस्व गाजवू दिले आणि त्यासाठी मला मोठी किंमत मोजावी लागली. हे नाते मिस इंडिया स्पर्धेपूर्वी सुरू झाले आणि नऊ वर्षे टिकले. पण, हे व्हायचे नव्हते. त्यानंतर माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली."
2008 मध्ये दीपकचा एका लहान मुलाला बुडताना वाचवण्यापासून मृत्यू झाला. याचा नम्रताला खूप मोठा धक्का बसला. ती दीपकच्या घरी त्याच्या कुटूंबाचं सांत्वन करण्यासाठी गेली होती.
2005 मध्ये नम्रताने महेश बाबूशी लग्न केलं.