Anuradha Vipat
‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिधिमा पंडित नुकतीच एग्ज फ्रिजिंग याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
रिधिमा आता 33 वर्षांची असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने एग्ज फ्रिजिंगचा आपला अनुभव सांगितला.
रिधिमाने सांगितलं की जेव्हा एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा ती शूटिंगमध्ये व्यस्त असायची. यामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
इंजेक्शनमुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला आणि ही संपूर्ण प्रक्रिया दमछाक करणारी असते, असंही तिने म्हटल आहे
रिधिमा म्हणाली,वयोमानानुसार आपल्या एग्जची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होत जातं. याविषयीची मला चांगलीच माहिती होती. म्हणूनच मी एग्ज फ्रिजिंगचा निर्णय घेतला
रिधिमाच्या आधी इतरही बऱ्याच अभिनेत्रींनी एग्ज फ्रिजिंगचा पर्याय निवडला आहे.