Anuradha Vipat
अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या ‘बरसातें’ या मालिकेमुळे तुफान चर्चेत आहे.
आता खऱ्या आयुष्यातही शिवांगी आणि कुशल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे
या चर्चांवर अखेर शिवांगीने मौन सोडलं आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली आहे.
पोस्टमध्ये शिवांगीने लिहिल आहे की, ‘माझ्या शब्दांना चुकीच्या पद्धतीने मांडल्याने आणि त्यातून चुकीचा अर्थ काढल्याने मी काही लोकांवर खूप नाराज आहे.
पुढे शिवांगीने लिहिल आहे की, मला सोशल मीडियावर होणाऱ्या अफवांविषयी सर्वसाधारण प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मी म्हणाले, “अफवा त्यासाठीच असतात ना? त्या येतात आणि जातात.
मला आणि माझ्या कुटुंबीयांना बराच त्रास सहन करावा लागला आहे’, असंही तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे
शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे