Anuradha Vipat
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा आर्या आई झाली आहे.
श्रद्धा आता जुळ्या बाळांची आई झाली आहे.
श्रद्धाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून तिच्या बाळांच्या जन्माची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.
लग्नाच्या तीन वर्षांनंतर श्रद्धा व तिचा पती राहुल नागल आई-बाबा झाले आहेत.
श्रद्धाने तिच्या बेडशेजारी लावलेल्या फुग्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या फुग्यांवर ‘बेबी बॉय’ व ‘बेबी गर्ल’ लिहिलेलं दिसत आहे.
श्रद्धाला एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी अपत्ये झाली आहेत.