पुजा बोनकिले
उन्हाळा अतिशय त्रासदायक असल्यामुळे त्वचेची आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची याबाबत अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी खास टिप्स दिल्या आहेत
घराबाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी प्या. पाण्याची बॉटल न चुकता बरोबर ठेवा. त्वचा उत्तम राहण्यासाठी पाणी पिणं गरजेचं असतं.
त्वचेवर मुरूम किंवा रॅशेस येऊ नयेत म्हणून बाहेरून आल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. खूप घाम येत असेल तर चेहरा दोन वेळा क्लींजिग करायला अजिबात विसरू नका.
घराबाहेर पडणार नसलात, तरीही रोज न चुकता सनस्क्रीन लावावे.
पाणी, ताक किंवा लस्सी, लिंबू-पाणी, कैरी पन्हे ही इत्यादी घरगुती पेये आवर्जून प्यावीत.
रिकाम्यापोटी उन्हात बाहेर पडू नये.
उन्हात बाहेर जाताना डोके झाका. टोपी, कापड किंवा छत्रीचा वापर करा.