Anuradha Vipat
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेला 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.
हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
या सिनेमासंदर्भातील तेजश्रीच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सिनेमाचे शोज हाऊसफुल्ल असूनही थिएटर मिळत नसल्याचं तेजश्रीने सांगितलं आहे.
मराठी सिनेमांना महाराष्ट्रामध्ये थिएटर मिळत नसल्यामुळे तेजश्रीने खंत व्यक्त केली आहे
खंत व्यक्त करत तेजश्रीने लिहिलं आहे की, 'हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा आमचा सिनेमा हाऊसफुल आहे पुणे आणि मुंबईमध्ये पण महाराष्ट्रात मराठी सिनेमासाठी थिएटर्स उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे
हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला.