kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान कायमच चर्चेत असते.
आजवर तेजश्रीने अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण सध्या तिचं एक जुनं फोटोशूट व्हायरल होत आहे.
तेजश्रीने 2018 मध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या गाजलेल्या लूकमधील फोटोशूट केलं. तिच्या आणि श्रीदेवी यांच्या चेहऱ्यातील साम्य पाहून लोकही चकित झाले.
तेजश्रीचं हे फोटोशूट पाहून अनेकांनी ती हुबेहूब श्रीदेवी सारखी दिसते अशी कमेंट केली होती. तिचा लूक, तिचे डोळे याचंही अनेकांनी कौतुक केलं.
फोटोशूट
तेजश्रीचं हे फोटोशूट तेजस नेरुरकरने केलं होतं. या फोटोशूटला त्यांनी tribute to chandani असं कॅप्शन दिलं होतं.
अनेकांप्रमाणे मिस्टर इंडिया हा तेजश्रीचा लाडका सिनेमा आहे.
सध्या तेजश्री ब्रेकवर असून लवकरच ती एखाद्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.