kimaya narayan
बॉलिवूडमधील एक गाजलेला सिनेमा म्हणजे शोले. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमजद खान, संजीव कुमार यांसारख्या दिग्गजांच्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे.
शोले या सिनेमाने त्या काळी बॉक्स ऑफिसवर 35 करोड रुपयांची कमाई केली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता.
या सिनेमातील प्रत्येक पात्र गाजलं. पण एक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे ते म्हणजे गब्बर सिंह. अमजद खान यांनी ही भूमिका साकारली होती.
या सिनेमातील फक्त पात्रच नाहीत तर संवादही सगळ्यांच्या लक्षात राहिलेच नाही तर सुपरहिट ठरले. आजही हे अनेकांना संपूर्ण डायलॉग्ज पाठ आहेत.
पण तुम्हाला माहितीये का ? या सिनेमातील कितने आदमी थे ? हा गाजलेला संवाद अमजद खान यांना म्हणताच येत नव्हता.
गब्बर सिंह यांच्या तोंडी असलेला कितने आदमी थे ? हा संवाद खूप गाजला. पण शुटिंगवेळी हा डायलॉग बोलताना अमजद खान यांची भंबेरी उडाली होती.
हा संवाद परफेक्ट म्हणण्यासाठी अमजद खान यांनी 40 रिटेक्स घेतले तरीही दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या मनासारखी डायलॉग डिलिव्हरी ते करत नव्हते.
शेवटी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना त्यांना ब्रेक घेऊन आराम करायला सांगितलं. ही गोष्ट अमजद यांच्या मनाला लागली आणि ते रात्रभर झोपू शकले नाहीत. पण नंतर त्यांनी साकारलेला गब्बर अजरामर ठरला.