Anuradha Vipat
अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला आहे
उर्मिलाच्या करने दोघांना उडवलं असून त्यात एकाच मृत्यू झाल्याचं सोमर येत आहे. तसेच एकजण गंभीर जखमी आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.
उर्मिला सकाळी कामावरून घरी परत असताना हा अपघात झाला.
अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली आहे.
ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते अशी माहिती समोर आलेली आहे.
उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती.