Anuradha Vipat
भाजपा आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत एक वक्तव्य केलं होतं
आता त्या सर्व आरोपांवर संताप व्यक्त करत प्राजक्तानं पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे
तसेच "वैयक्तिक स्वार्थासाठी अभिनेत्रींची नावं का घेतात ?असा संतप्त सावल करत प्राजक्ताने धसांना खडे बोल सुनावले आहेत.
तसेच या प्रकरणात सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील प्राजक्तानं केली आहे
त्याचबरोबर या प्रकरणाची महिला आयोगाकडं तक्रार केली असल्याचं प्राजक्तानं स्पष्ट केलं आहे
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना समज द्यावी अशी मागणी देखील प्राजक्ता माळीनं या पत्रकार परिषदेत केली आहे
तसेच तुमच्या राजकारणासाठी आमच्या सारख्या महिला कलाकारांची अब्रु वेशीवर का टांगता ?असा संतप्त सवाल करताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले.