Anushka Tapshalkar
आजच्या संगणकाच्या इतिहासात एका महिलेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. तिचे नाव आहे ॲडा लव्हलेस!
Ada Lovelace Computer History
sakal
१९व्या शतकात चार्ल्स बॅबेज यांनी Analytical Engine या यांत्रिक संगणकाची संकल्पना मांडली. हे यंत्र गणिती गणना करण्यासाठी तयार करण्याची योजना होती.
Ada Lovelace Computer History
sakal
ॲडा यांनी बॅबेज यांच्या यंत्रावरील लेखाचे भाषांतर केले आणि त्यासोबत स्वतःच्या सविस्तर नोंदी लिहिल्या. त्यात गणिती गणनांसाठी अल्गोरिदमही होता.
Ada Lovelace Computer History
sakal
बेर्नुली संख्यांची गणना करण्यासाठी त्यांनी लिहिलेला अल्गोरिदम संगणक प्रोग्रामिंगच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
Ada Lovelace Computer History
sakak
ॲडा यांना जाणवले की अशा यंत्रांचा उपयोग केवळ गणिती गणनांसाठीच नव्हे, तर योग्य सूचना दिल्यास संगीतासारख्या गोष्टींसाठीही होऊ शकतो.
Ada Lovelace Computer History
sakal
ॲडा या प्रसिद्ध इंग्लिश कवी लॉर्ड बायरन यांच्या कन्या होत्या. त्यांच्या आईने त्यांना गणित आणि तर्कशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले.
Ada Lovelace Computer History
sakal
संगणक आजच्या स्वरूपात अस्तित्वात येण्याच्या कित्येक दशकांपूर्वीच ॲडा यांनी प्रोग्रामिंगची क्षमता ओळखली होती. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत.
Ada Lovelace Computer History
sakal
इंग्लंडमधील हॉर्सले पार्कशी ॲडा यांचा संबंध होता. या ऐतिहासिक वास्तूला त्यांच्या जीवनकथेच्या संदर्भात विशेष महत्त्व आहे.
Ada Lovelace Computer History
sakal
आज स्मार्टफोन, संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. संगणकाच्या क्षमतेविषयी दूरदृष्टी दाखवणाऱ्या ॲडा यांचे योगदान त्यामुळे विशेष ठरते.
Ada Lovelace Computer History
sakal
सदर माहिती इतिहासाच्या पाऊलखुणा या फेसबुक पेजवरून घेण्यात आली आहे.
Reference
sakal
Rani Karnavati History
esakal