'या' हिंदू राणीने ३० हजार मुघल सैन्याचं कापलेले नाक, इतिहासातील थरारक घटना !

Yashwant Kshirsagar

गौरवशाली राणी

उत्तराखंडच्या इतिहासात राणी कर्णावतीचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले आहे. हिमाचलच्या राजघराण्यात जन्मलेल्या या राणीने मुघलांचा अत्यंत अपमानजनक पराभव घडवून आणला.

Rani Karnavati History

|

esakal

गढवालची गादी

१६३१ मध्ये राजा महीपत शाह यांच्या निधनानंतर गढवालची गादी एका स्त्रीच्या खांद्यावर आली. त्यांचा मुलगा केवळ सात वर्षांचा होता आणि राज्य शत्रूंच्या वेढ्यात होते.

Rani Karnavati History

|

esakal

मुघल-कुमाऊँचा कट

१६३५ मध्ये कुमाऊँचा राजा बाज बहादूर चंद याने दिल्लीचा मुघल सम्राट शाहजहान याच्याशी हातमिळवणी करून गढवालवर आक्रमण करण्याचा कट रचला.

Rani Karnavati History

|

esakal

तीस हजार सैनिकांची मुघल सेना

मुघल सेनापती नजाबत खान याने ३०,००० सैनिकांचे प्रचंड सैन्य घेऊन गढवालच्या दिशेने कूच केले आणि रायवाला (सध्याचे डेहराडून) येथे तळ ठोकला.

Rani Karnavati History

|

esakal

राणीची चातुर्यपूर्ण रणनीती

मुघलांनी दहा लाख रुपये मागितले किंवा युद्धाला सामोरे जा असे सांगितले. राणीने वेळ मारून नेण्यासाठी एक लाख रुपये दिले आणि त्याच वेळी युद्धाची तयारी सुरू केली.

Rani Karnavati History

|

esakal

गनिमी कावा

गढवाली सैनिकांनी डोंगरावरून वेढा घातला. गुरिल्ला युद्धतंत्र आणि डोंगराळ प्रदेशातील कौशल्यामुळे मुघल सैन्याचा निभाव लागला नाही.

Rani Karnavati History

|

esakal

मुघलांचा रसदपुरवठा संपला

मुघलांचा रसदपुरवठा संपला, पळून जाण्याचे मार्ग बंद झाले आणि सैनिक पूर्णपणे थकले. नजाबत खानला माघार घ्यावी लागली.

Rani Karnavati History

|

esakal

राणीची कठोर अट

राणीने एकच अट घातली – “तुमची नाकं कापून घ्या आणि तरच परत जा.” दुसरा पर्याय नसल्याने हजारो मुघल सैनिकांनी आपली नाकं कापून घेतली.

Rani Karnavati History

|

esakal

नजाबत खानची आत्महत्या

अपमानाने व्यथित होऊन नजाबत खानने आत्महत्या केली. त्यानंतर मुघलांनी पुन्हा कधीही गढवालवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही.

Rani Karnavati History

|

esakal

‘नक्कटी राणी’

या घटनेनंतर राणी कर्णावती ‘नक्कटी राणी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. तिने केवळ युद्ध जिंकले नाही तर डेहराडून, मसुरी परिसरात कृषी विकास, समाजकल्याण आणि प्रशासकीय सुधारणांचा पायाही घातला. आजही ती धैर्य आणि आत्मसन्मानाची प्रेरणा आहे.

Rani Karnavati History

|

esakal

मोहम्मद घोरीला रणांगणातून चक्क पळवून लावलं; 'या' हिंदू राणीने घडवला इतिहास!

Rani Naiki Devi History

|

esakal

येथे क्लिक करा