सकाळ डिजिटल टीम
सोडियम हा घटक मीठात असतो, शरीरातील द्रव संतुलन नियंत्रणासाठी महत्त्वाचा आहे. चिमूटभर मीठ पाण्यात टाकून पिण्यामुळे शरीरातील पाणी बॅलेन्स होते.
अती प्रमाणात व्यायाम केल्याने महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स जसे की सोडियम आणि पोटॅशियम कमी होतात. मिठाचे पाणी सेवन केल्याने इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून निघते.
सोडियम हे स्नायू संकुचनांसाठी महत्त्वाचे आहे. पाण्यात चिमूटभर मीठ टाकून पिल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण बॅलेन्स केल्याने स्नायूंचे कार्य सुरळीत होते.
मीठ पचनासाठी महत्त्वाचे असते, कारण ते पचन एंझाइम्स आणि लाळ तयार करायला मदत करते. यामुळे पचन प्रक्रिया सुरू होते आणि पोषण घटकांचे शोषण सुधारते.
मीठ जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो, परंतु पाण्यात चिमूटभर मीठ टाकल्याने रक्तदाब बॅलेन्स होतो.
मीठात अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. मिठाचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला डिटॉक्स ठेवण्यास मदत होते.
सोडियमचे योग्य प्रमाण तणाव, हार्मोन जसे की कोर्टिसोल आणि ऍड्रेनालिन नियंत्रित करते. त्यामुळे शांत झोप लागते.
सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारख्या खनिजांनी भरपूर असलेले मीठ त्वचेसाठी चांगले असते. मीठ पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेटेड राहते आणि तिचे लवचिकता वाढते.
मिठाचे योग्य प्रमाण लक्षात ठेवा, चिमूठभर मीठ एक ग्लास पाण्यात टाकून पिणे. स्वतच्या डायट मध्ये काही नवीन समावेश करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.