सकाळ डिजिटल टीम
कॅन्सर झपाट्याने वाढणारा आजार बनला आहे, पण योग्य सवयी अंगीकारून आपण कॅन्सर होण्याचा धोका कमी करू शकतो.
सतत तणावाखाली राहणे शरीरावर प्रतिकूल परिणाम करते. हसतमुख राहा, सकारात्मक विचार ठेवा आणि जीवनातील छोट्या आनंदांचा स्वीकार करा.
दररोज योग, ध्यान आणि शारीरिक व्यायाम केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि कॅन्सरसाठी लढण्याची ताकद मिळते. व्यायामामुळे विषारी घटक बाहेर जातात.
रासायनिक खतांचा वापर केलेले अन्न आणि पॅकबंद पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात. शक्य तितक्या ऑरगॅनिक आणि घरगुती पदार्थांचा समावेश करा.
अधिक साखर शरीरात इन्फ्लेमेशन (दाह) वाढवते, जो अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. साखर नियंत्रित प्रमाणात घ्या आणि नैसर्गिक गोड पदार्थ निवडा.
दीर्घकालीन तणाव शरीराच्या पेशींवर नकारात्मक परिणाम करतो. ध्यान, संगीत, छंद आणि चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवणे तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
तंबाखू आणि मद्यपान कॅन्सरचे प्रमुख कारण आहेत. त्यामुळे यापासून दूर राहणे आवश्यक आहे.
कॅन्सर ओळखता आला तर तो नियंत्रणात ठेवणे सोपे होते. नियमित आरोग्य तपासणी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महिलांना शरीरातील बदल किंवा लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, आणि कोणतेही त्रास अंगावर न काढता योग्य उपाय करा.
संतुलित आहार, सकारात्मक दृष्टिकोन, आणि मनःशांती राखणे शरीराला मजबूत आणि रोगप्रतिकारक बनवते. हे सर्व इतर अनेक आजारांपासूनही संरक्षण करू शकते.