सकाळ डिजिटल टीम
आपण आपल्या जीवनशैलीत आरोग्याचा विचार हा केलाच पाहिजे.
सोप्या आणि योग्य सवयींचा समावेश करून आपण निरोगी राहू शकतो. त्यासाठी या पुढील सवयी नक्कीच महत्वपूर्ण ठरतील.
रोज चहा किंवा काॅफीऐवजी ग्रीन टी किंवा गरम पाणी पिणे.
रोज दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात एक भाग कच्ची कोशिंबीर घेणे.
आठवड्यातून एकदा रागी किंवा ज्वारीसारख्या भरडधान्याचा उपयोग.
आठवड्यातून तीन वेळा योग किंवा घरच्या घरी व्यायाम करणे.
सणसमारंभात थोड्या प्रमाणात गोड खाणे.