Mayur Ratnaparkhe
मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू -
या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे तब्बल ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेसह पहिल्या क्रमांकावर आहेत.
तर दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू असून त्यांची संपत्ती ३३२ कोटी रुपये आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ५१ कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी -
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत, त्यांची मालमत्ता १५ लाख रुपयांपेक्षा थोडीशी जास्त आहे.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मालमत्ता ५५ लाख रुपयांची आहे.
मुख्यमंत्री पिनारायी विजयन -
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे १ कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त संपत्ती असलेले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी मालमत्ता असलेले मुख्यमंत्री आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची संपत्ती १.४६ कोटी रुपये आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकूण संपत्ती १.५४ कोटी रुपये आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची संपत्ती १.६४ कोटी रुपये आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची संपत्ती १.९७ कोटी रुपये आहे.
एडीआरच्या अहवालानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती १३.२७ कोटी आहे.