Apurva Kulkarni
सर्दी, खोकला असेल तर आल्याची बर्फी शरीरासाठी फायदेशील ठरते. ती बर्फी कशी बनवतात ते पाहूया...
किसलेले आले, साखर, दूध, तूप, वेलदोड्याची पूड, पिठीसाखर. (किंवा गूळ)
एका कढईत आले, साखर आणि दूध एकत्र करून साखर विरघळेपर्यंत शिजवा. (तुम्ही गुळही घालू शकतात.)
त्यात तूप आणि वेलदोड्याची पूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
मिश्रण बटर पेपरवर पसरवा, वरून पिठीसाखर टाका.
मिश्रण थंड झाल्यावर बार्फीचे चौकोनी तुकडे करा.
जायफळ, काजू किंवा बदाम घालून तुम्ही बर्फीला अधिक स्वादिष्ट बनवू शकतात.
आद्रकची बर्फी ही आरोग्यास फायदेशीर आहे. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा.