तुम्ही पित आहात ते दूध खरे की नकली? 'या' ५ सोप्या उपायांनी घरच्या घरी करा तपासणी

Yashwant Kshirsagar

फळे, भाज्या

फळे आणि भाज्या रसायनांचा वापर करून कृत्रिमरित्या पिकवल्या जातात आणि अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृत्रिम (बनावट) दूध देखील जप्त करण्यात आले आहे.

How to Check Adulterated Milk?

|

esakal

कृत्रिम दूध

कृत्रिम दूध बनवणाऱ्यांचा दावा आहे की, याचे उत्पादन स्वस्त असते पण ते अस्सल दुधाच्या दराने विकले जाते, ज्यामुळे मोठा नफा मिळतो. दररोज हजारो लिटर दुधाची विक्री-खरेदी होते.

How to Check Adulterated Milk?

|

esakal

फरक कसा ओळखायचा?

आपण खरोखर अस्सल दूध पित आहोत का? पॅकबंद दूध किती सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे? जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल, तर अस्सल आणि कृत्रिम दुधातील फरक कसा ओळखायचा हे आपण जाणून घेऊया.

How to Check Adulterated Milk?

|

esakal

कृत्रिम दुधात कोणती भेसळ ?

साधारणपणे, दुधात मोठ्या प्रमाणात पाणी मिसळले जाते, पण काही लोक ते घट्ट करण्यासाठी त्यात स्टार्च,काहीजण डिटर्जंट युरिया मिसळतात; कृत्रिम दूध ओळखण्याचे काही मार्ग पुढील प्रमाणे आहेत.

How to Check Adulterated Milk?

|

esakal

लाकडाची चाचणी

लाकडी पृष्ठभाग किंवा काचेची पट्टी घ्या आणि त्यावर दुधाचा एक थेंब टाका. जर दूध हळू वाहत असेल आणि मागे खूणा सोडत असेल, तर ते अस्सल आहे. जर ते वेगाने घसरून खाली पडत असेल, तर त्यात पाणी मिसळलेले आहे.

How to Check Adulterated Milk?

|

esakal

काचेच्या पेल्यातील चाचणी

डिटर्जंट किंवा युरियासारखे घटक ओळखण्यासाठी, एक लहान पेला घ्या आणि त्यात ५ मिली दूध व तितकेच पाणी मिसळा. हे मिश्रण जोरात हलवा; जर खूप कमी फेस तयार झाला आणि तो लवकर नाहीसा झाला, तर दूध अस्सल आहे. जर फेस लवकर नाहीसा झाला नाही, तर त्यात भेसळ असू शकते.

How to Check Adulterated Milk?

|

esakal

मीठ वापरून तपासणी

मीठ वापरून तुम्ही दुधातील स्टार्चची उपस्थिती ओळखू शकता. एका पेल्यात ५ मिली दूध घ्या आणि त्यात आयोडीन द्रावणाचे २-३ थेंब टाका. जर दुधाचा रंग निळा झाला, तर त्यात स्टार्च आहे.

How to Check Adulterated Milk?

|

esakal

लिटमस तपासणी

युरियाची भेसळ ओळखण्यासाठी, दुधात थोडी तुरीच्या डाळीची पूड मिसळा आणि ५ मिनिटे ढवळा. त्यानंतर, लाल लिटमस पेपरची पट्टी वापरून तपासणी करा; जर कागद निळा झाला, तर दुधात भेसळ असू शकते.

How to Check Adulterated Milk?

|

esakal

जांभळासोबत 'हे' ५ पदार्थ कधीच खाऊ नका, नाही तर आरोग्यावर होईल मोठा परिणाम

Foods to avoid with jamun

|

esakal

येथे क्लिक करा