सकाळ डिजिटल टीम
मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? काय सांगते गरूड पुराण जाणून घ्या.
life after death
sakal
मृत्यूच्या वेळी सूक्ष्म शरीर (ज्याला आपण आत्मा म्हणतो) स्थूल शरीराचा त्याग करते. गरुड पुराणानुसार, कर्माच्या आधारे आत्मा डोळे, मुख किंवा शरीराच्या इतर नऊ द्वारांतून बाहेर पडतो.
life after death
sakal
शरीराचा त्याग केल्यानंतर दोन यमदूत आत्म्याला घेण्यासाठी येतात. ज्यांनी सत्कर्मे केली आहेत त्यांना सौम्य यमदूत दिसतात, तर पापी व्यक्तीला अत्यंत भयानक यमदूत दिसतात. असे म्हंटले जाते.
life after death
sakal
यमदूत आत्म्याला अवघ्या काही क्षणांत यमलोकात घेऊन जातात. तिथे चित्रगुप्त त्या व्यक्तीच्या कर्मांचा लेखाजोखा वाचतात. त्यानंतर, पुन्हा एकदा कर्माची फळे आणि ओढ पाहून आत्मा आपल्या घरी परत येतो.
life after death
sakal
मृत्यूनंतर १३ दिवस आत्मा आपल्या कुटुंबीयांच्या आणि घराच्या आसपास राहतो. तो त्याच्यासाठी दिल्या जाणाऱ्या पिंडाचा आणि अन्नाचा स्वीकार करतो, जेणेकरून त्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळेल.
life after death
sakal
गरुड पुराणानुसार, ज्या आत्म्यांचे पिंडदान किंवा अंत्यविधी शास्त्रोक्त पद्धतीने होत नाहीत, त्यांना प्रेत योनीत भटकावे लागते आणि त्यांना भूक-तहानेचा तीव्र त्रास होतो.
life after death
sakal
ज्यांचे पुण्य जास्त आहे, त्यांना 'स्वर्गा'त सुख उपभोगण्यासाठी पाठवले जाते. याउलट, ज्यांनी महापाप केले आहे, त्यांना त्यांच्या कर्माच्या स्वरूपावरून विविध 'नरकां'मध्ये शिक्षा भोगण्यासाठी पाठवले जाते. असे म्हणतात.
life after death
sakal
काही आत्मे त्यांचे भोग संपल्यानंतर 'पितृलोकात' राहतात. आपल्या वंशजांकडून श्राद्ध किंवा तर्पण मिळाल्यावर त्यांना शांती मिळते आणि ते त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात.
life after death
sakal
एकदा कर्माची फळे भोगून झाली की, आत्मा पुन्हा पृथ्वीवर नवीन शरीरात प्रवेश करतो. हा नवीन जन्म मागील जन्मातील वासना आणि कर्मांवर आधारित असतो. जोपर्यंत 'मोक्ष' मिळत नाही, तोपर्यंत हे जन्म-मृत्यूचे चक्र सुरूच राहते.
life after death
sakal
Oldest Gate In India
ESakal