Pranali Kodre
भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर अनेकदा त्याच्या खेळाव्यतिरिक्त त्याच्या स्टायलिश लूकसाठीही चर्चेत येत असतो. त्याचे बऱ्याचदा पार्टीतील फोटोही व्हायरल होतात.
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोबत देखील त्याचे काही डान्स व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर बरीच उलटसुलट चर्चाही झालेली.
परंतु, श्रेयसची बहिण डान्सर असल्याने आणि धनश्रीही डान्सर असल्याने त्यांच्यात मैत्री आहे. त्यामुळे श्रेयसचेही तिला भेटणे झाल्याचे समोर आले होते.
आता श्रेयसचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो मोहम्मद कैफची पत्नी पूजासोबत दिसत आहे.
मोहम्मद कैफने त्याची पत्नी पूजासह त्याच्या मित्राच्या ५० व्या बर्थडे पार्टीसाठी गेला होता. या पार्टीमध्ये श्रेयस अय्यरही आला होता.
यावेळी त्यांनी एकत्र फोटो काढले. याचदरम्यान पूजा आणि श्रेयस यांनीही एकत्र फोटो काढले. हे फोटो मोहम्मद कैफने शेअर केले आहेत.
दरम्यान, सध्या अशी चर्चा आहे की श्रेयस अय्यर तिशा कुलकर्णीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.