Pranali Kodre
चेस चॅम्पियन मॅग्नस कार्लसन २०२५ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न बंधनात अडकला आहे.
जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने त्याची गर्लफ्रेंड एला व्हिक्टोरिया मॅलोनसोबत लग्न केले आहे. नॉर्वेमध्ये त्यांचा लग्नसोगळा पार पडला.
माग्नसने ओस्लोचे आयकॉनिक 5-स्टार ग्रँड हॉटेलमध्ये लग्नाचे रिसेप्शन ठेवले होते.
तेथील स्थानिक मीडियानुसार मॅग्नस आणि एला यांनी -७ डिग्री सेल्सियन तापमान असताना
ओस्लो या नॉर्वेच्या राजधानीत लग्न केले.
२६ वर्षीय एला ओस्लोमध्ये लहानाची मोठी झाली, त्यानंतर तिने अमेरिकेत शिक्षण घेतले. ती बरीच वर्षे सिंगापूरमध्ये राहिली. तिने तेथील नागरिकत्वही घेतले आहे.
मॅग्नस आणि एलाच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले आहेत.