ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय? RTOला भेट न देता 'अशा'प्रकारे घरीच बसून मिळवा डुप्लिकेट लायसन्स

Mansi Khambe

लायसन्स हरवणे

गाडी चालवण्यासाठी लोकांकडे काही कागदपत्रे असणे खूप महत्वाचे असते. यापैकी ड्रायव्हिंग लायसन्स महत्त्वाची गोष्ट आहे. याशिवाय कोणालाही गाडी चालवताना पकडल्यास दंड भरावा लागतो.

Driving License | ESakal

महत्त्वाचे ओळखपत्र

केवळ गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स उपयुक्त नसून ते एक वैध ओळखपत्र म्हणून देखील काम करते. मात्र अनेकदा लोकांचा ड्रायव्हिंग लायसन्स हरवतो. तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे ही एक मोठी समस्या असू शकते.

Driving License | ESakal

आरटीओची गरज

अशावेळी लोकांच्या मनात ड्रायव्हिंग लायसन्स पुन्हा बनवावे लागेल, आरटीओ कार्यालयात जाऊन तीच प्रक्रिया पुन्हा करावी लागेल असा विचार येतो. परंतु आता असे काहीही करावे लागणार नाही.

Driving License | ESakal

डुप्लिकेट लायसन्स

तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स हरवला असेल तर घरी बसून दुसरे डुप्लिकेट बनवणे शक्य झाले आहे. यामुळे आरटीओमध्ये जाण्याची अजिबात गरज पडणार नाही.

Driving License | Esakal

प्रक्रिया काय

यासाठी तुम्हाला परिवहन सेवा पोर्टलच्या अधिकृत पोर्टल Parivahan.gov.in ला भेट द्यावी लागेल. सर्वप्रथम तुम्हाला येथे लॉग इन करुन 'ऑनलाइन सेवा' वर जावे लागेल आणि 'ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा' निवडावे लागेल.

Driving License | ESakal

ऑनलाइन

यानंतर तुमचे राज्य आणि आरटीओ निवडा. येथे तुम्हाला 'डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स' चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर, एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला माहिती भरावी लागेल. परवाना क्रमांक, जन्मतारीख आणि नोंदणी तपशील.

Driving License | ESakal

आवश्यक कागदपत्रे

त्यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून आधार, पॅन किंवा कोणतेही कागदपत्र अपलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागेल.

Driving License | ESakal

शुल्क

यानंतर, निर्धारित शुल्क भरावे लागेल. यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल, ज्याद्वारे तुम्ही स्थिती ट्रॅक करू शकता. डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स बनवल्यानंतर, ते तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.

Driving License | ESakal

तुमची चपाती आता बनेल सुपरफूड! जाणून घ्या 6 स्मार्ट हेल्दी ट्विस्ट

येथे क्लिक करा