संतोष कानडे
धनंजय मुंडेंनी करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी द्यावी, असे निर्देश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत.
याशिवाय धनंजय मुंडे हे करुणा मुंडेंचे पती आहेत आणि घरगुती हिंसा झाली आहे, असं कोर्टाने अंशतः मान्य केलं आहे.
धनंजय मुंडेंची मी पहिली पत्नी आहे, २६ वर्षे मी त्यांच्यासोबत संसार केला आहे आणि त्यांच्यापासून मला दोन मुलं आहेत, असं करुणा मुंडे सांगतात.
धनंजय मुंडे हे मुलांची योग्य प्रकारे काळजी घेतात, मात्र मला पहिल्या पत्नीचा दर्जा मिळत नाही, असा करुणा यांचा आक्षेप आहे.
कौटुंबिक कोर्टाच्या ऑर्डरनुसार अनेक मुद्दे पुढे आलेले आहेत. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना लग्नानंतर परळीला का नेलं नाही? असा प्रश्न उपस्थित झाला.
प्रेमविवाह असल्यामुळे प्रतिष्ठेला आणि राजकीय करिअरला बाधा निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांनी करुणा यांना परळीला नेलं नाही, अशी बाजू करुणा यांच्या वकिलाने मांडली.
याशिवाय प्रेमविवाह असल्यामुळे धनंजय मुंडे यांचं कुटुंब त्यांना स्वीकारणार नाही, पर्यायाने कौटुंबिक कलह निर्माण होईल, अशी भीती धनंजय यांना होती.
परंतु करुणा मुंडेंना परळीला जाऊन रहायचं होतं, असं त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. मात्र ते शक्य झालं नाही. त्यानंतर धनंजय यांचं दुसरं लग्न झालं.
करुणा मुंडेंवरुन धनंजय मुंडेंच्या घरामध्ये कलह सुरु आहे. करुणा यांच्या मुलाने वडिलांची बाजू घेत ते आमच्यासोबत असल्याचं म्हटलंय
मात्र करुणा मुंडेंनी आरोप केलाय की, धनंजय यांनी मुलांना आपल्या बाजूने वळवून घेतलं आहे.
वाल्मिकबद्दल गोपीनाथ मुंडेंचं 'ते' विधान खरं ठरलं