आकाशात झेप घेताच 'ही' विमाने झाली गायब, अजूनही सापडले नाहीत पुरावे

Mansi Khambe

अहमदाबाद विमान अपघात

काल, अहमदाबादमधील एका निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. यामध्ये २४१ जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बचावल्याचे समोर आले आहे. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

Ahemadabad plane crash | ESakal

अनेक विमाने गायब

जगभरात आतापर्यंत विमानाचे अनेक अपघात झाले आहेत. इतकेच नव्हे तर आकाशात उडाल्यानंतर अनेक विमाने गायब झाली आहेत, हे तुम्हाला माहितेय का? जाणून घ्या याबाबतची सर्व माहिती

Missing Passenger Flights | ESakal

मलेशिया एअरलाइन्स

२०१४ मध्ये, मलेशिया एअरलाइन्सचे विमान MH370 क्वालालंपूरहून बीजिंगला गेले. या विमानात एकूण २३९ प्रवासी होते. उड्डाणादरम्यान विमान व्हिएतनामच्या हवाई हद्दीतून जात असताना त्याचा संपर्क तुटला. तथापि, आजपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही.

Missing Passenger Flights | ESakal

पॅसिफिक महासागरावरून विमान बेपत्ता

१९६२ मध्ये, फ्लाइंग टायगर लाइन फ्लाइट ७३९, ९३ अमेरिकन सैनिक आणि ११ क्रू मेंबर्सना घेऊन फिलीपिन्सला जाणार होते. मात्र पॅसिफिक महासागरावरून बेपत्ता झाले आणि आजपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही.

Missing Passenger Flights | ESakal

अमेरिकन एअरवेज विमान

३० जानेवारी १९४८ रोजी, ब्रिटिश साउथ अमेरिकन एअरवेजचे विमान स्टार टायगरने पोर्तुगालच्या अझोर बेटावरून २५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्ससह बर्म्युडासाठी उड्डाण केले, परंतु तिथे पोहोचताच त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला.

Missing Passenger Flights | ESakal

स्टार एरियल विमान

१७ जानेवारी १९४९ रोजी अमेरिकन एअरलाइन्सचे स्टार एरियल विमान बेपत्ता झाले. या विमानात १३ प्रवाशांव्यतिरिक्त ७ क्रू मेंबर्स होते.

Missing Passenger Flights | ESakal

फ्लोरिडातील प्रशिक्षण उड्डाण

५ डिसेंबर १९४५ रोजी, १४ वैमानिकांना घेऊन जाणारे एक नियमित प्रशिक्षण उड्डाण फ्लोरिडा येथून निघाले. मात्र काही काळानंतर त्याचा बेस स्टेशनशी संपर्क तुटला. त्याचा शोध घेण्यासाठी विमाने पाठवण्यात आली, पण काहीही सापडले नाही.

Missing Passenger Flight | ESakal

न्यूयॉर्कहून मियामीला जाणारे विमान

२ जुलै १९५५ रोजी फ्लाइट ९१४ ने न्यूयॉर्कहून अमेरिकेतील मियामीला उड्डाण केले, परंतु हे विमान देखील हवेत गायब झाले. या जहाजात एकूण ५७ प्रवासी होते.

Missing Passenger Flight 914 | Esakal

अलास्कामध्ये विमान हवेत गायब

काही दिवसांपूर्वी अलास्कामध्ये १० जणांना घेऊन जाणारे एक विमान अचानक हवेत गायब झाल्याची बातमी आली. त्याचा शोध अजून लागलेला नाही.

Missing Passenger Flights | ESakal

तणाव वाढतोय? मग 'हे' ड्रायफ्रुट्स नक्की खा!

stress | Sakal
<strong>येथे क्लिक करा </strong>