Pranali Kodre
सचिन तेंडुलकरचा २५ वर्षीय मुलगा अर्जुन तेंडुलकर नुकताच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार १३ ऑगस्ट २०२५ रोजी अर्जुनचा सानिया चंडोकसोबत साखरपुडा झाला आहे.
अर्जुन आणि सानिया गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचे समजले आहे.
अर्जुन आणि सानियाचा साखरपूडा खाजगी कार्यक्रमाच कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला असल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत.
दरम्यान अर्जुनपेक्षा सानिया एक वर्षाने मोठी आहे. अर्जुनचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला आहे, तर सानियाचा जन्म २३ जून १९९८ मध्ये झाला आहे.
विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्यातही ५ वर्षांचा फरत असून अंजली सचिनपेक्षा मोठी आहे. त्यामुळे बऱ्याचदा ते चर्चेत असतात.
तथापि, अर्जुन आणि सानिया यांच्या साखरपूड्याची बातमी समोर आली असली, तरी अद्याप दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही किंवा फोटोही शेअर करण्यात आलेले नाही.