गणेशपूजेतील पवित्र 'आघाडा'! आघाड्याच्या पानांचा रस पिल्यावर काय होते?

सकाळ डिजिटल टीम

२१ पत्रींपैकी एक

भाद्रपद गणेशोत्सवात बाप्पाला अर्पण केल्या जाणाऱ्या २१ पत्रींमध्ये 'अपामार्ग पत्रम्' म्हणजेच आघाड्याच्या पानांचा विशेष समावेश असतो.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

शास्त्रीय ओळख

आघाड्याचे शास्त्रीय नाव 'Achyranthes aspera' असून संस्कृतमध्ये याला 'अपामार्ग' म्हणतात; आयुर्वेदात याला अतिशय पूजनीय स्थान आहे.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

नकारात्मक ऊर्जा दूर ठेवणारी वनस्पती

धार्मिक मान्यतेनुसार आघाड्यात वातावरणातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याची शक्ती असते, म्हणून देवपूजेत हा पवित्र मानतात.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

दात आणि हिरड्यांचे आरोग्य

ग्रामीण भागात याच्या वाळलेल्या काडीचा वापर दातवण म्हणून करतात; यामुळे दातदुखी, हिरड्यांतून रक्त येणे अन् तोंडाची दुर्गंधी थांबते.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

अपचनावर गुणकारी

आघाड्याच्या पानांचा रस किंवा काढा घेतल्यास अपचन, गॅस, पोटफुगी अन् बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन भूक सुधारण्यास मदत होते.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

मुतखड्याचा त्रास कमी

आयुर्वेदानुसार आघाड्यात मूत्रल गुणधर्म असतात; याचा योग्य प्रमाणात काढा प्यायल्याने लघवी साफ होते अन् किडनी स्टोनचा त्रास कमी होतो.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

त्वचेचे संसर्ग

पानांचा लेप खाज, खरुज अन् इसबवर अत्यंत गुणकारी ठरतो; तसेच जखमेवर रस लावल्यास जंतुसंसर्ग रोखून जखम वेगाने भरून येते.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

कीटकदंशावर आराम

विंचू, मधमाशी किंवा विषारी कीटक चावल्यास आघाड्याच्या पानांचा रस किंवा मूळ उगाळून लावल्याने जळजळ अन् सूज झटपट कमी होते.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

अपामार्ग क्षार

आघाड्यापासून तयार केलेले भस्म (अपामार्ग क्षार) मधासोबत सेवन केल्यास जुनाट खोकला, दमा आणि कफ दोषावर त्वरित आराम मिळतो.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

वजन नियंत्रण

या वनस्पतीच्या बियांची खीर किंवा काढा अतिभूक लागण्याची सवय कमी करतो; ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटवून वजन वेगाने कमी होते.

Aghada (Apamarga) Health Benefits

|

sakal 

लाल पोकळ्याची भाजी कधी खाल्ली का? पाहा सोपी रेसिपी अन् फायदे!

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

आणखी वाचा