लाल पोकळ्याची भाजी कधी खाल्ली का? पाहा सोपी रेसिपी अन् फायदे!

सकाळ डिजिटल टीम

रोजच्या भाजीला उत्तम अन् टेस्टी पर्याय

तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनणारी पौष्टिक लाल पोकळ्याची भाजी आणि देठीची चटकदार रेसिपी नक्की ट्राय करा.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

सोपे साहित्य

पोकळा जुडी, कांदा, लसूण, हिरवी मिरची, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, दाण्याचे कूट, साखर, कोथिंबीर, २-३ चमचे दही आणि तेल.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

अशी बनवा चटकदार पोकळ्याची भाजी

भाजी धुऊन, चिरून घ्या. तव्यात तेलात हिंग, मोहरी, लसूण अन् कांदा परता; त्यात भाजी घालून ५-७ मिनिटे उघडीच परतून शिजवून घ्या.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

स्वादिष्ट देठीची कोशिंबीर

देठाचे मध्यम तुकडे पाण्यात शिजवा. थंड झाल्यावर त्यात दाण्याचे कूट, साखर, मीठ, मिरचीची फोडणी, कोथिंबीर अन् दही घालून कालवा.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

लोहाचा खजिना; ॲनिमियावर गुणकारी

लाल पोकळ्यात नैसर्गिक आयर्न मुबलक असते; ज्यामुळे शरीरात तांबड्या रक्तपेशी वेगाने वाढतात आणि रक्ताची कमतरता दूर होते.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

अँटिऑक्सिडंट्सने भरपूर

यातील अँथोसायनिन्स आणि बीटासायनिन हे घटक शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

हृदय निरोगी अन् बीपी नियंत्रणात

पोकळ्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो अन् वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदय निरोगी राहते.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

कॅल्शियमचा स्रोत

कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन K मुबलक असल्याने हाडांची घनता वाढते अन् ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून बचाव होतो.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

पचनक्रिया सुरळीत अन् बद्धकोष्ठता दूर

यातील फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते; नियमित सेवनाने जुनाट बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि अपचनाच्या तक्रारी दूर होतात.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

दृष्टी तीक्ष्ण अन् इम्युनिटी मजबूत

व्हिटॅमिन A, C आणि बीटा-कॅरोटीनमुळे डोळ्यांचे आरोग्य जपले जाते अन् शरीराची रोगप्रतिकारशक्ती वेगाने मजबूत होते.

Red Amaranth (Pokla Bhaji) Recipe & Health Benefits

|

sakal 

कडू दोडका रोज खाल्ला तर काय होईल?

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

आणखी वाचा