सकाळ डिजिटल टीम
१६६९ साली औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून त्या जागी मशीद उभारली.
मल्हाररावांनी मंदिर पुन्हा बांधायचा विचार केला, पण स्थानिकांच्या विनंतीमुळे तो थांबवावा लागला.
अहिल्यादेवींनी १७७७ साली मशीदीशेजारी भव्य काशी विश्वनाथ मंदिर उभारलं.
अहिल्याबाईंनी १२ ज्योतिर्लिंगांसह अनेक मंदिरे बांधली आणि धार्मिक स्थळे पुनर्जीवित केली.
काशीच्या पवित्र मनिकर्णिका घाटाचा पुनर्निर्माण अहिल्यादेवींनी केला.
१७८३ साली सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या जागेवर नवीन मंदिर बांधलं आणि मूळ मूर्ती पुनर्स्थापित केली.
अहिल्यादेवींनी इतर धर्मियांच्या भावना न दुखावता धार्मिक एकता जपली.
काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीमुळे अहिल्यादेवी अजरामर झाल्या!