Yashwant Kshirsagar
होळी पेटवण्यासाठी शेणापासून बनविलेल्या गोवऱ्यांचा उपयोग केला जातो. पर्यावरणपूरक होलिका दहनासाठी शहरांतील सोसायट्यांमध्ये गोवऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हिंदू परंपरेत अनेक विधींसाठी गोवऱ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गोवऱ्यांना नेहमीच मागणी असते.
आहिल्यानगर मधील अमोल खुळे नावाच्या तरुणाने हीच संधी शोधून शेणापासून गोवऱ्या तयार करुन विक्रीचा व्यवसाय सुरु केला असून यातून तो वर्षाला लाखो रुपये कमवत आहे.
अमोल एका बॅंकेत जनरल मॅनेजर या पदावर काम करत होता, वर्षाकाठी 10 लाख रुपयांचे पॅकेज बँकेकडून अमोलला मिळत होते,पण तिथे त्याचे मन रमले नाही. वडिलोपार्जित शेती तो करु लागला.
घरी असलेली शेती आणि पाच गाई संभाळण्यास अमोलने सुरू केली. गाईंच्या दुधाला दर कमी मिळत असल्याने गायांच्या शेणातून उत्पन्नाचा मार्गही शोधला, गोवऱ्या बनविण्यास सुरुवात केली.
अमोलने या गोवऱ्या पुणे, नाशिक, मुंबई येथे नेऊन विक्री करण्यास सुरू केल्या गोवऱ्यांना मागणीही चांगली येण्यास सुरुवात झाल्याने अमोलने आणखी 70 गाई विकत घेतल्या.
मागील चार वर्षांपासून अमोल आणि त्याचे संपूर्ण कुटुंब गाईंच्या शेणापासून गोवऱ्या बनवत आहे. दररोज एक हजार बाराशे गोवऱ्या थापण्याचे काम कुटुंब करते. दहा ते बारा रुपयाला एक गोवरी विकली जाते.
दरवर्षी थंडीतच गोवऱ्या बनवल्या जातात. त्यामुळे गोवऱ्याही चांगल्या होत आहेत. अमोल कुटूंब चार महिन्यात जवळपास दोन लाख गोवऱ्या थापते, त्याची विक्री वेगवेगळ्या शहरांत होते.
घरी असलेल्या 70 गाईंचे दररोज चारशे लिटर दूध आणि या गायांचे गोमूत्र धरून 50 रुपये लिटर दराने विक्री करत आहे.
खुळे कुटूंब वर्षाकाठी सगळा खर्च वजा करून 30 ते 35 लाख रुपये निव्वळ नफा मिळवत आहे.