Yashwant Kshirsagar
शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक हिंदू सरदार आणि सैनिकांसोबत अनेक मुस्लिम अधिकारी आणि सैनिक देखील होते. अफजल खान वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 10 अंगरक्षकांपैकी सिद्धी इब्राहिम हा एक मुस्लिम अंगरक्षक होता.
दर्यासारंग दौलत खान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा एक सुभेदार होता.
छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडाच्या वेड्यातून सोडवताना वेढा फोडताना सिद्धी वाहवाह व त्याचा पिता सिद्धीहिलाल धारातीर्थी पडला होता.
मदारी मेहतर फरास यास छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सिंहासनावर चादर टाकण्याचा मान दिला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूरखान बेग नावाचा एक सरदारही होता
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी केळशीच्या बाबा याकुत यांचाही मान सन्मान लागला होता.
काझी हैदर नावाचा एक हुशार व्यक्ती शिवछत्रपतींच्या दरबारात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाने वागविले. दरबारातील काही छोट्या-मोठ्या न्यायाचे अधिकार दिले, त्याला वकिलाचा दर्जाही दिला.