Aarti Badade
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बाळेश्वर डोंगररांगेत पेमगिरी हा दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला वसलेला आहे.
Pemgiri Fort Ahmednagar history
sakal
निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे भोसले यांनी १६३३ ते १६३६ या काळात याच पेमगिरी किल्ल्यावरून ३ वर्षे स्वतंत्र राज्यकारभार चालवला होता.
Pemgiri Fort Ahmednagar history
Sakal
शहाजीराजांच्या ऐतिहासिक वास्तव्यामुळे या किल्ल्याला 'शाहगड' असेही म्हटले जाते. स्वराज्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नांचा हा किल्ला मूक साक्षीदार आहे.
Pemgiri Fort Ahmednagar history
Sakal
पेमगिरी किल्ला संगमनेर-अकोले रस्त्यावरील कळस गावाजवळ असून, येथे प्राचीन पेमादेवी मंदिर आहे, जे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
Pemgiri Fort Ahmednagar history
Sakal
पेमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी एक विशाल वटवृक्ष आहे. निसर्गप्रेमींसाठी हे एक मोठे आकर्षण असून या वडाचा विस्तार पाहून पर्यटक थक्क होतात.
Pemgiri Fort Ahmednagar history
Sakal
हा किल्ला यादवकालीन मानला जातो. येथे पडक्या तटबंदीचे अवशेष, चोर दरवाजा आणि कोरडी पाण्याची टाकी आजही पाहायला मिळतात.
Pemgiri Fort Ahmednagar history
Sakal
पेमगिरी हा एक छोटा डोंगरी किल्ला असून ट्रेकर्ससाठी हे उत्तम डेस्टिनेशन आहे. किल्ल्याच्या माथ्यावरून अहिल्यानगरचा निसर्गरम्य नजारा दिसतो.
Pemgiri Fort Ahmednagar history
Sakal
इतिहास, निसर्ग आणि शांतता यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर या सुट्टीत पेमगिरी किल्ल्याला नक्की भेट द्या. अहिल्यानगरमधील हा लपलेला खजिना आवर्जून पहा.
Pemgiri Fort Ahmednagar history
Sakal
Bhendi Bazaar Mumbai history
Sakal