Saisimran Ghashi
एअर इंडियाचे प्रवासी विमान अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कोसळले.
विमानाचे कमांड कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे सह-पायलट होते.
कॅप्टन सुमीत यांना LTC प्रकाराच्या विमानाचे 200 तासांचे उड्डाणाचे अनुभव आहे.
फर्स्ट ऑफिसर कुंदर यांना फक्त ११ तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.
फर्स्ट ऑफिसर हा कनिष्ठ पायलट असतो जो कॅप्टनसोबत सहायक म्हणून कार्य करतो; अनुभवानंतर त्याला कॅप्टनपद मिळते.
उड्डाणानंतर थोड्याच वेळात ATC ला मेडे कॉल देण्यात आला, परंतु त्यानंतर विमानाने प्रतिसाद दिला नाही.
विमान कोसळल्यानंतर विमानतळाच्या बाहेर प्रचंड काळा धूर दिसत होता, आणि हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे व्हिडिओ व फोटोद्वारे दिसून येते.
या अपघातग्रस्त विमानामध्ये 230 प्रवाशी आणि 12 क्रू मेंबर होते