अहमदाबादवर मराठ्यांचं राज्य कसं आलं? व्यवहार कोण पाहायचं?

Sandip Kapde

इतिहास —

अहमदाबाद हे गुजरातमधील अत्यंत महत्त्वाचं आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध शहर असून विविध सत्तांच्या बदलांमुळे त्याला वेगवेगळे राजकीय रंग मिळाले.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

स्थापना —

पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला सुलतान अहमदशाह यांनी या शहराची स्थापना करून त्याला मजबूत पायाभूत रचना दिली.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

राजधानी —

गुजरातची प्रमुख राजधानी म्हणून अहमदाबाद दीर्घकाळ ओळखलं जात होतं आणि व्यापाराच्या दृष्टीनेही ते केंद्रबिंदू बनलं.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

भरभराट —

कापड उद्योगाच्या जोरावर शहराने प्रचंड आर्थिक प्रगती केली आणि देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

मुघलकाल —

अकबर यांच्या काळात अहमदाबादमध्ये मुघल सत्तेचा प्रभाव दृढ झाला आणि सुभेदारांच्या माध्यमातून कारभार चालू लागला.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

मराठे —

अठराव्या शतकात अहमदाबाद मराठ्यांच्या अधिपत्याखाली आलं आणि इथल्या प्रशासनात मोठे बदल घडून आले.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

स्वाऱ्या —

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत स्वारीपासून गुजरातमध्ये मराठ्यांची उपस्थिती जाणवू लागली आणि पुढील मोहिमांना दिशा मिळाली.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

सेनापती —

धनाजी जाधव यांनी 1706 मध्ये नर्मदा ओलांडून भरूचपर्यंत धडक देत मराठ्यांची ताकद दाखवून दिली.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

दाभाडे —

खंडेराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठा सत्ता स्थिर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्थानिक पातळीवर प्रभाव निर्माण केला.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

स्वारी —

उमाबाई दाभाडे यांनी मोठ्या फौजेसह अहमदाबादवर स्वारी करून सुभेदाराला धडा शिकवला, जरी पूर्ण सत्ता ताब्यात आली नव्हती.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

अधिपत्य —

1752 मध्ये रघुनाथराव पेशवे आणि दमाजी गायकवाड यांनी अहमदाबाद पूर्णपणे मराठ्यांच्या अधिपत्याखाली आणलं.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

महसूल —

अहमदाबादसारख्या समृद्ध शहरातून पेशव्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असे आणि त्यामुळे त्याचं राजकीय महत्त्व अधिक वाढलं.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

सुभेदार —

आबा शेलुकर यांनी आपल्या काळात शहरात कडक आणि प्रभावी प्रशासन चालवलं, ज्यामुळे त्यांची दहशतही निर्माण झाली.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

त्रिंबकजी —

त्रिंबकजी डेंगळे यांची अहमदाबादच्या सुभेदारपदी नेमणूक झाली, मात्र त्यांनी प्रत्यक्ष न जाता आपल्या प्रतिनिधींमार्फत कारभार चालवला आणि अधिक महसूल उभारण्यावर भर दिला.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

वस्ती —

अहमदाबादमधील भद्रा किल्ल्याजवळ मराठी समाजाची मोठी वस्ती होती, जिथे ब्राम्हण, कायस्थ प्रभु आणि मराठा कुटुंबे दीर्घकाळ स्थायिक झाली होती.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

Ahmedabad Under Maratha Rule

युद्ध —

1817-18 च्या तिसरे इंग्रज-मराठा युद्ध नंतर पेशव्यांचा पराभव झाला आणि अहमदाबाद इंग्रजांच्या ताब्यात गेलं.

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

१४ रुपये तोळा सोने, १ रुपयात ३० किलो तूप! १७२० मध्ये काय होता बाजारभाव? पाहून थक्क व्हाल

Ahmedabad Under Maratha Rule

|

esakal

येथे क्लिक करा