संतोष कानडे
अहमदाबादमध्ये गुरुवारी भीषण विमान अपघात झाला. विमानामध्ये २४२ जण प्रवास करीत होते.
या अपघातामध्ये सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. अपघातग्रस्त विमान हे एअर इंडियाचं होतं.
एअर इंडियाचं हे जे ड्रीमलायनर ७८७ विमान आहे, ते प्रवाशांच्या खास पसंतीचं असल्याचं सांगितलं जातं.
सप्टेंबर २०१२ मध्ये एअर इंडियाचं पहिलं बोइंग 787 ड्रीमलाइनर ताफ्यात दाखल झालं होतं.
आलिशान आणि लक्झरी विमान म्हणून ड्रीमलायनर ७८७चा समावेश होतो. त्यामुळे ते प्रवाशांच्या पसंतीचं आहे.
ड्रीमलायनरच्या समावेशामुळे एअर इंडिया ही देशातील पहिली विमान कंपनी ठरली होती.
या विमानामध्ये अडीचशेपेक्षा जास्त सीट्स असतात आणि दहापेक्षा जास्त क्रू मेंबर्स असतात.
ड्रीमलाइनर जेट अल्युमिनियमऐवजी कार्बन कंपोझिटच्या सहाय्याने तयार केलेले आहे. त्यामुळे विमानाचे वजन तुलनेत खूप कमी आहे.
या विमानाची भार वाहून नेण्याची क्षमता इतर विमानांच्या तुलनेत अधिक आहे. ड्रीमलाइनरमध्ये इंधनाची २० टक्क्यांपर्यंत बचत होते.