Saisimran Ghashi
आज दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले
हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असताना ही दुर्घटना घडली
आता या अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे
ब्लॅक बॉक्स हा एक क्रॅश-प्रोटेक्टेड फ्लाइट रेकॉर्डर असतो जो विमानाच्या उड्डाणाशी संबंधित माहिती आणि ध्वनी रेकॉर्ड करतो. यात फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) असतो.
विमान अपघात किंवा गंभीर घटनांनंतर नेमकं काय झालं हे समजण्यासाठी आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी ब्लॅक बॉक्स वापरला जातो. हा विमान सुरक्षा सुधारण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक साधन आहे.
यात उड्डाणातील सुमारे ३५०० विविध प्रकारचे पॅरामीटर्स रेकॉर्ड केले जातात, जसे की कॉपिट कमांड्स, फ्लाइट कंट्रोल्स, इंजिन माहिती, इंधन प्रणाली, रेडिओ संभाषण, आणि इतर आवाज.
ब्लॅक बॉक्स आग, स्फोट, अपघाताचा आघात व पाण्यात बुडण्यानंतरही नीट राहतो. त्यामुळे अपघातानंतरही डेटा सुरक्षित राहतो.
ब्लॅक बॉक्सचा आरंभ १९३० च्या दशकात फ्रेंच अभियंता फ्रांस्वा हुस्सेनो यांनी केला. त्यावेळी डेटा एक प्रकाशरोधक डब्यात चित्रपटावर रेकॉर्ड केला जायचा, म्हणून याला ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणतात तो बॉक्स प्रत्यक्षात केशरी रंगाचा असतो.