Saisimran Ghashi
सांगली शहरातील श्री गणपती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे.
हे मंदिर १८४३ मध्ये सांगली रियासतचे पहिले शासक श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधले.
१८०८ पर्यंत सांगली हे एक छोटे गाव होते. पटवर्धनांनी येथे राजधानी स्थापन करून शहराचा विकास केला.
शहराचे रक्षण करण्यासाठी गणेशदुर्ग किल्ला बांधण्यात आला. त्याच काळात मंदिराचे बांधकामही सुरू झाले.
श्री गणपती मंदिराचे बांधकाम १८१३ च्या सुमारास सुरू झाले आणि ते सांगली रियासतचे प्रमुख धार्मिक केंद्र बनले.
हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर बांधले असून, पुरापासून सुरक्षित राहील अशा पद्धतीने त्याचा पाया मजबूत करण्यात आला.
मंदिराचा पाया चुनखडीने भरलेला असून, त्यामुळे पूर येऊनही पाणी मंदिरात घुसत नाही.
फक्त हिंदूच नाही, तर इतर धर्मीयांनाही येथे भगवान गणेशाबद्दल विशेष श्रद्धा आहे.
श्रीमंत पटवर्धन यांच्या पुढाकाराने मंदिराचा परिसर अलीकडेच सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यात आला.