अमिताभ डंबलडोर तर शाहरुख हॅरी पॉटर तर वोल्डमोर्टच्या लूकमधील अभिनेत्याला पाहून व्हाल चकित !

kimaya narayan

हॅरी पॉटर

संपूर्ण जगभरात गाजलेली हॉलिवूड फिल्म सिरीज म्हणजे हॅरी पॉटर. आजही हे सिनेमे लोकप्रिय आहेत. जे के रोलिंगच्या पुस्तकांवर आधारित असलेला हा सिनेमा बॉलिवूडमध्ये बनला असता तर कुणी कोणत्या भूमिका साकारल्या असत्या हे झूम टीव्हीने AI च्या मदतीने केलं आहे.

Harry Potter | esakal

प्रोफेसर डंबलडोर - अमिताभ बच्चन

हॅरी पॉटर सिरीजमधील महत्त्वाचं पात्र असलेल्या प्रोफेसर डंबलडोर यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड व्हर्जनमध्ये साकारली असती. हे कास्टिंग एकदमच परफेक्ट आहे असं म्हणावं लागेल.

Harry Potter | esakal

हॅरी पॉटर - शाहरुख खान

हॅरीची भूमिका सगळ्यांचा लाडका बॉलिवूड स्टार शाहरुख खानला देण्यात आलीये. हॅरीच्या मानाने शाहरुखचं वय जास्त असलं तरीही शाहरुख लहान असता तर या भूमिकेत शोभला असता.

Harry Potter | esakal

प्रीती झिंटा -हरमायनी

हॅरीची बेस्ट फ्रेंड आणि हॉग्वर्ट्समधील हुशार विद्यार्थिनी हरमायनीच्या भूमिकेत दिसली असती अभिनेत्री प्रीती झिंटा. प्रीतीनेही ही भूमिका उत्तम साकारली असती.

Harry Potter | esakal

रॉन - सैफ अली खान

रॉनच्या भूमिकेत दिसला असता अभिनेता सैफ अली खान. हॅरीचा जिगरी मित्र असलेला सैफने कमाल साकारला असता यात शंका नाही. पण आता जर ही संधी आली तर तैमूर योग्य व्यक्ती ठरेल.

Harry Potter

प्रोफेसर मॅकगोनागल - रेखा

प्रोफेसर डंबलडोर यांच्या राईट हॅन्ड थोडक्यात हॉग्वर्ट्सच्या उपमुख्याध्यापिका प्रोफेसर मॅकगोनागलच्या भूमिकेसाठी रेखा यांची निवड केलीये. अर्थात या भूमिकेत त्या छान दिसल्या असत्या.

Harry Potter | esakal

मॅल्फॉय -सलमान खान

हॅरीचा शाळेतील कट्टर शत्रू असलेल्या मॅल्फॉय काहीशी निगेटिव्ह शेड असलेली भूमिका साकारली असती अभिनेता सलमान खानने. खऱ्या आयुष्यात मित्र असलेले हे दोघे ऑनस्क्रीन शत्रू म्हणून कसे दिसले असते याची फॅन्सनी कल्पना करायला हवी.

Harry Potter | esakal

प्रोफेसर स्नेप - संजय दत्त

हॅरीचा तिरस्कार करणारे आणि त्याला छुपी मदत करणाऱ्या प्रोफेसर स्नेपच्या भूमिकेत दिसला असता अभिनेता संजय दत्त. एक वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत संजू बाबाला पाहायला अनेकांना आवडलं असतं.

Harry Potter | esakal

प्रोफेसर ल्युपिन - अनिल कपूर

हॅरीचे लाडके प्रोफेसर आर जे ल्युपिन यांच्या भूमिकेत दिसले असते अनिल कपूर. अर्थात त्यांच्या अंदाजात ल्युपिन पाहणं मजेशीर ठरलं असत.

Harry Potter | esakal

सिरीयस ब्लॅक - जॅकी श्रॉफ

हॅरीचा गॉडफादर आणि मित्र असलेला सिरीयस ब्लॅक साकारला असता जॅकी श्रॉफने. भिडू रूपातील सिरीयस पाहणं म्हणजे प्रेक्षकांना एक ट्रीट असती.

Harry Potter | esakal

वोल्डमोर्ट - हृतिक रोशन

हो ! पाहून धक्का बसला असता ना. वोल्डमोर्टच्या भूमिकेत हृतिक कसा दिसला असता हे पाहणं नक्कीच गंमतीशीर असतं.

Harry Potter | esakal
Aditi Govitrikar | esakal
अदिती सध्या काय करते - येथे क्लिक करा